आष्टी ( रिपोर्टर):- मराठा आरक्षणात सगेसोय-यांचा समावेश करत अंमलबजावणी करा या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.यासाठी मनोज जरांगेच्या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टी तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम व रस्ता रोको आंदोलन सकाळी 11 वाजता करण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने एक दिवशीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लागल्याचा दावा केला मात्र सरकारने सगेसोयरे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला त्यानुसार आष्टी तालुक्यात आष्टी शहरातील महात्मा फुले चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,धामणगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक,धानोरा येथे संतोषीमाता मंदिरासमोर,चिंचपूर बसस्थानक,खडकत येथे खडकत चौक आष्टी रोड,डोईठाण येथील बसस्थानक आदी ठिकाणी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत रस्ता रोको करण्यात आला












