गेवराई (रिपोर्टर) सगेसोयरे अमलबजावणी साठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज गेवराई तालुक्यातील ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला
. मनोज जरंगे पाटील यांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार तालुक्यात सर्वत्र हे अनसोळं करण्यात आले. यावेळी गेवराई बायपास, कोळगाव, उमापूर, रानमळा, सिरसदेवी, कुंभारवाडी, पांढरवाडी, पाडळशिंगी, तलवाडा, रोहितळ, जातेगाव फाटा यासह तालुक्यातील ठीकठिकाणी रस्तारोको आंदोलन करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी झालेल्या या रास्तारोको आंदोलनात मोठया संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.












