चोरट्याने एक गाडी चोरून नेली, दुसरी घटना स्थळी सोडली
बीड (रिपोर्टर): शहरामध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले. रात्री हॉटेल नीलकमल समोरून मोटारसायकल चोरून नेली. चोरटा मोटारसायकल चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. सदरील चोरट्याने एक गाडी चोरून नेली आणि त्याने आणलेली गाडी त्याच ठिकाणी सोडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून जी गाडी चोरट्याने घटनास्थळी सोडली ती गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दीपक येडके यांनी आपले मामा वसंत रोहीदास तायड यांची मोटार सायकल (क्र. एम.एच. 23 एस. 2670) ही रात्री हॉटेल नीलकमल समोर उभी केली होती. नऊ वाजण्याच्या दरम्यान एका चोरट्याने ही गाडी चोरून नेली. या चोरट्याच्या सोबत अन्य दोघेजण होते. चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला. चोरट्याने एक गाडी चोरून नेली तर दुसरी घटनास्थळी सोडली. त्या गाडीचा नंबर एम.एच. 23 पी. 6141 असा आहे. या गाडीची खात्री केली असता ती चोरीची असल्याचे समोर आले आहे. गाडी चोरी प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.