दोन आरोपी अटक, पहाटेच्या दरम्यान चंदन घेवून जाणारा पकडला टॅम्पो
पोलीस अधिक्षक ठाकुर यांची केज पोलीस ठाण्याला भेट कर्मचार्यांचे केले कौतुक
केज, (सय्यद माजेद)ः-धारूर वरून लातुरकडे एका टॅम्पोत मोठ्या प्रमाणात चंदन जात असल्याची माहिती बीडच्या एलसीबीला व केज पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी पहाटे सापळा रचुन धारूर रोडवर टॅम्पो पकडला. या टॅम्पोची झाडाझडती घेतली असता टॅम्पोत 12 हजार 35 किलो चंदनाचा गाभा आढळुन आला. याची किंमत जवळपास 2 कोटी रूपये आहे. या कारवाईने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. टॅम्पोसह चंदन जप्त करण्यात आले असुन दोघांजणांना पोलीसांनी अटक केली.

आज सकाळी जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी केज पोलीस ठाण्यात भेट देवून ज्या कर्मचार्यांनी ही धाडसी कारवाई केली त्या कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.
धारूर वरून लातुरकडे टॅम्पो क्रं. एम.एच.24ए.यु.9383 यामध्ये चंदन जात असल्याची माहिती बीडच्या एलसीबी व केज पोलिसांना झाल्यानंतर पोलीसांनी पहाटे धारूर रोडवरील नेहरकर पंपाजवळ सापळा लावला. सदरील टॅम्पो आल्यानंतर त्यांची झाडाझडती घेतली असता या टॅम्पोमध्ये 1235 किलो चंदन आढळुन आले या चंदनाची किंमत जवळपास 2 कोटी इतकी असल्याचे समजते. या प्रकरणी प्रितम काशीनाथ साखरे (रा.गुरूवार पेठ अंबाजोगाई) व शंकर पंढरी राख (रा.कवडगाव ता.केज) या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मिना याच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरिक्षक संतोष साबळे, एपीआय गणेश मुंडे, पोलिस नाईक नसीर शेख, तुषार गायकवाड, भागवत शेलार, कैलास ठोबरे, हनुमंत खेडकर, संजय जायभाय, गणेश मराडे, केज पोलिस ठाण्यात पोलिस निरिक्षक महाजन, पीएसआय पाटील, पोलिस नाईक दिलीप गित्ते, पोलिस नाईक शिवाजी कागदे, पोलिसनाईक संतोष गित्ते, पो.ना.शेख मतीन, पो.ना.उल्हास राठोड यांनी केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी जिल्हापोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी केज पोलीस ठाण्याला भेट देवून कारवाई करणार्या पोलीस कर्मचार्याचे कौतुक केले.











