मध्यरात्री घडला प्रकार
अंबाजोगाई (रिपोर्टर): अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली असून रात्री चक्क एटीएम मशीनच चोरट्यांनी उचलून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना यशवंतराव चव्हाण चौक परिसरात घडली.
अंबाजोगाई तालुक्यामध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज कुठे ना कुठे चोर्या होऊ लागल्या. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरीकांसह व्यापार्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण परिसरात इंडिया 1 कंपनीचे खासगी एटीएम आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या एटीएमवर दरोडा घालत चक्क एटीएम मशीनच लंपास केली. दरम्यान या एटीएममध्ये संबंधित बँकेची किती कॅश होती हे समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.