पोलिसांच्या पाठलागाने चोरटे धास्तावले, एटीएम मशीनसह पिकअप सोडून चोरटे पळाले
किल्ले धारूर (रिपोर्टर): धारूर शहरासह धारूर ते तेलगाव रोडवर पहाटेच्या दरम्यान चोर-पोलिसांचा थरारक खेळ रंगल्याचे चित्र पहावयास मिळाले. शहरातल्या तेलगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेचे 21 ते 22 लाख रुपये असलेले एटीएम मध्यरात्री चोरट्यांनी चोरून पिकअपमध्ये टाकून ते पळवले. याची माहिती काही वेळात पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला. चोरटयांनाही पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी माजलगाव तालुक्यातील जायकवाडी परिसरामधील एका खोलीत एटीएम मशीन लपविली तर काही अंतरावर पिकअप सोडून चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पोलिसांनी पिकअपसह एटीएम मशीन हस्तगत केली मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. एटीएम चोरीसाठी वापरण्यात आलेला पिकपही चोरीचा असल्याचे स्पष्ट झाले असून या घटनेने धारूर तालुक्यात एकच खळबळ उडाली.
धारूर येथील तेलगाव रोड वरती हुतात्मा स्मारकाच्या समोर भारतीय स्टेट बँक आहे या स्टेट बँकेचे एटीएम काल मध्यरात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु ते फुटत नसल्याने चोरट्याने ते पूर्ण एटीएम पिकप मध्ये टाकले व चोरून घेऊन जाऊ लागले याचा सुगावात धारूर पोलिसांना लागला पोलिसांनी लागलीच त्या पिकप गाडीचा पाठलाग केला परंतु गाडी वेगाने पळवत माजलगाव तालुक्यातील या ठिकाणी जायकोवाडी पिकप एटीएम मशीन सह सोडून चोर पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले आतील रोकड व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले . चोरट्यांचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक डी बी वाघमोडे यांनी सांगितले आहे. धारूर पोलीस यांनी कौतुकास्पद काम केले आहे या कामगिरीमध्ये पोलीस कर्मचारी भुसारी ,पोलीस नाईक शेख यांनीही मोलाची कामगिरी बजावली आहे.