बीड (रिपोर्टर):- शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रे लागत असतात, हे कागदपत्रे तहसील कार्यालयातून काढावे लागतात. बीड तहसीलमध्ये जवळपास बारा हजार अर्ज पेंडींग पडलेले आहेत,सदरील अर्ज कधी निकाली काढण्यात येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयात वरीष्ठांचा वचक नाही. ज्यांच्या माध्यमातून हे अर्ज दिले जातात ते मग्रूर कर्मचारी कोणालाच दाद देत नाहीत. ‘आमचं कुणी काही वाकडं करु शकत नाही’ असं ते संबंधीतांना सांगत असतात. विद्यार्थ्यांची आडवणूक करणारांना धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे.
बीडच्या तहसील कार्यालयात कुणाचा वचक राहिला नाही. जो तो कर्मचारी मनमानी कारभार करत आहे. तहसील कार्यालयातून शाळा, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जे कागदपत्र लागतात. ते कागदपत्र तहसील कार्यालयातून दिले जातात. त्यासाठी एक टेलब आहे. त्या टेबलवर चार कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली. हे कर्मचारी त्या,त्या, महा ई सेवा केंद्राकडे प्रमाणपत्र पाठवत असतात, हे प्रमाणपत्र पाठवतांना मोठी आर्थिक मागणी सुध्दा होते. तहसीलदार कुलकर्णी हे आपल्यापासून त्यांना कार्यालयात काहीच ताळमेळ लागेला. डिजीटल स्वाक्षरी कुणाकडे जावू लागली. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. प्रमाणपत्र देणारे कर्मचारी मग्रूरीची भाषा करत असतात. आमचं कुणी काही वाकडं करु शकत नाही या भाषेत ते बोलत असतात. विद्यार्थ्यांची जाणीवपुर्वक आडवणुक करणार्या कर्मचार्यांना धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे.