बीड, (रिपोर्टर)ः- पावसाळा सुरू होवून दिड महिना उलटला अजुनही मराठवाड्यातील धरणामध्ये पाणी साठा जमा झाला नाही. 11 प्रकल्पात फक्त 14.56 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणात पाणी येण्यासाठी धुवाधार पावसाची गरज आहे. जायकवाडीमध्ये 4 टक्के पाणीसाठा शिल्लक असुन बीडच्या माजलगाव आणि मांजरा धरण मृत साठ्यात आहे.
यावर्षी जून महिन्यात पाऊस पडला असला तरी हा पाऊस पेरणी योग्य झाला. या पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली नाही. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे अनेक धरणांनी तळ गाठला तर काही धरणातच पाण्याचा साठा काही प्रमाणात शिल्लक होता. पावसाळा सुरू होवून दिड महिना झाला असुनही धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. मराठवाड्यातील 11 प्रकल्पात फक्त 14.56 टक्के पाण्याचा साठा आहे. बीड जिल्ह्यातील मांजरा आणि माजलगाव हे दोन्ही धरणे मृत साठ्यात आहेत. जायकवाडी धरणातही 4 टक्के पाण्याचा साठा शिल्लक असुन धरणामध्ये पाणी पातळी वाढण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे.