बीड (रिपोर्टर)ः-जिल्हा न्यायालयासमोरील हॉटेल चालक नय्यर मामू यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ते सर्वत्र परिचीत होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णांलयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची काल प्राणज्योत मालवली.
शहरातील शहेशांहनगर भागात राहणारे मोमीन नय्यर (मामू) अब्दुल मोमीन सलाम वय-40 वर्षे यांचे गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा न्यायालयासमोर चहाचे हॉटेल आहे. नय्यर मामू हे सर्वत्र परिचीत होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. गेल्या काही महिन्यापासून हे आजारी होते.
त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा काल मृत्यु झाला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नय्यर हे मामू नावाने परिचीत होते. ते रिपोर्टर परिवारातील सदस्य होते. त्यांचा दफनविधी आज सकाळी तकीया मस्जीद कब्रस्तान याठिकाणी करण्यात आला. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटूबीयांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.