बीड रिपोर्टर
विशाळगड वर झालेल्या हिंसाचार प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसून येत असून बीड जिल्ह्यातही विशाळगड परिसरातील मुस्लिमांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निदर्शनास करत निषेध व्यक्त केला जात आहे बीड शहरात आज दुपारी एम आय एम च्या वतीने निदर्शने करण्यात आली हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी हजारो मुस्लिम समाज बांधवांनी केली सदरचे निदर्शने हे बीड शहरातील बशीरगंज भागात करण्यात आले
गेल्या तीन दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही असमाजिक तत्त्वांच्या लोकांनी मुस्लिम समाजाला टारगेट करत विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मुसलमान वाडी व गजापूर येथील मुस्लिमांच्या घरांवर दगडफेक करत तोडफोड केली 70 ते 80 मोटरसायकल फोडून टाकण्यात आल्या एका घराला आगही लावण्यात आली. सदरची घटना घडल्यानंतर त्या हिंसाचाराचे संतप्त आणि निषेधार्य पडसाद आता राज्यात उमटताना दिसून येत आहेत. शासन प्रशासन व्यवस्थेच्या कुचकामी धोरणामुळे तेथील मुस्लिम समाजांवर हल्ला झाल्याचे सांगत राज्यभरातला मुस्लिम समाज त्या गंभीर घटनेचा आणि हिंसाचाराचा निषेध करत आहे. आज दुपारी बीड शहरामध्ये एम आय एम च्या वतीने निदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले. सदरचे निदर्शने हे शहरातील बशीरगंज चौकात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बशीरगंज भागात जमा होऊ लागले. त्या ठिकाणी शासन प्रशासन व्यवस्थेच्या विरोधात घोषणाबाजी करत विशाळगड हिंसाचार प्रकरणी दोशींवर कडक कारवाई करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मागणी उपस्थित निदर्शनकर्त्यांनी यावेळी केली
असेच आंदोलने आणि निदर्शने केज गेवराई माजलगाव आंबेजोगाई सह अन्य भागांमध्ये आज करण्यात आले








