बीड (रिपोर्टर): राज्यमंत्री दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे सदस्य समीर गुलामनबी काझी यांची निवड झाल्यानंतर बीड जिल्ह्याला आणखी एक सन्मानाचे पद मिळाले. तो आनंद आणि उत्साह द्विगुणीत करर्यासाठी समीर काझी यांचा उद्या 9 ऑगस्ट रोजी बीडमध्ये मोठा नागरी सत्कार रोटरी क्लब, क्रेडाई परिवार, बागवान बिरादरी, काझी सेवासंघ यांच्याकडून आयोजीत केला असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बीड येथील समीर गुलामनबी काझी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी व महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. बीड जिल्ह्यासाठी एक सन्मानाचं आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. त्याबद्दल रोटरी क्लब परिवार, क्रेडाई परिवार, बागवान बिरादरी पंच कमिटी आणि काझी सेवासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उद्या दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स, सोमेश्वर मंदिर जवळ भव्य नागरी सत्कार आयोजीत केला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.