• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home राजकारण

विरोधात वातावरण, तरीही भाजपानं सत्ता कशी खेचून आणली? हे ‘पाच’ मुद्दे ठरले कळीचे

by गणेश सावंत
October 8, 2024
Reading Time: 1 min read
0
विरोधात वातावरण, तरीही भाजपानं सत्ता कशी खेचून आणली? हे ‘पाच’ मुद्दे ठरले कळीचे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. मतमोजणीच्या प्रारंभिक फेऱ्यात भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. २०१४ पासून दोन वेळा भाजपाने राज्यात सत्ता मिळवली. दशकभरात भाजपाविरोधात रोष निर्माण झाल्याचे बोलले जात होते. काँग्रेसनेही आक्रमक प्रचार करत भाजपाला कडवी झुंज दिली होती. एग्झिट पोल्सनेही काँग्रेसच्या पारड्यात स्पष्ट बहुमत पडेल, असे सांगितले होते. मात्र आता भाजपाने बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. विजयाची हॅटट्रिक मारण्यात नेमके कोणते मुद्दे कारणीभूत ठरले. हे पाहू.

मुख्यमंत्री बदलल्याचा परिणाम

हरियाणामध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणि मतदारांच्या रोषामुळे भाजपाने जननायक जनता पक्षाशी युती तोडली आणि मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून अचानक बाजूला केले होते. त्यांच्या जागी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदावर बसविले गेले. १२ मार्च २०२४ रोजी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ओबीसी प्रवर्गातून येणारे सैनी यांना नेतेपदी आणल्यामुळे भाजपाबद्दलचा दृष्टीकोन बदलल्याचे राजकीय पंडित सांगतात. सैनी यांच्या रुपाने हरियाणाला पहिल्यांदाच ओबीसी मुख्यमंत्री मिळाला.जाट आणि दलितांची मते काँग्रेसला मिळतील, अशी भीती भाजपाला होती. कारण जाट उघडपणे काँग्रेसच्या बाजूने बोलत होते. यामुळे भाजपाने जाट समाज वगळून इतर समाजाला जवळ केले. निवडणुआधीच जाट समाजातील नेत्यांनी मतदानाआधीच काँग्रसेचा विजय झाल्याचे दर्शविले तर इतर समाजाने आपल्या राजकीय भूमिकेबाबत मौन बाळगले.

मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा
१६ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महेंद्रगड येथे मागासवर्गीय समाजाचे सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात अमित शाह यांनी मागासवर्गीय समाजाची क्रिमिलेयरची मर्यादा सहा लाखांवरून आठ लाखांवर नेली. राज्याच्या लोकसंख्येत तिसरा सर्वात मोठा भाग असलेल्या इतर मागासवर्गीय समाजावर भाजपाने विशेष लक्ष केंद्रीत केले.

मोदी ब्रँड चालला
संपूर्ण प्रचारात ब्रँड मोदीचाही लाभ भाजपाला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरीने १४ जाहीर सभा घेतल्या. पंतप्रधान मोदींनी मतदारांना आवाहन केल्यानंतर त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. भ्रष्टाचारमुक्त सरकार आणि पारदर्शक कारभार याचे महत्त्व अधोरेखित करण्यात भाजपा सरकार यशस्वी झाले.

स्वच्छ कारभार
सैनी सरकारने अतिशय अल्पावधीत सरकार चालविताना भाजपाच्या विरोधातील असंतोषाला कमी करण्याचे काम केले. लोकहिताचे निर्णय घेत सरकार सामान्यांच्या बाजूने असल्याचा विश्वास निर्माण केला. खट्टर मुख्यमंत्री असताना घेतलेले काही निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधाचे कारण बनले होते, हे निर्णय बदलण्यात किंवा त्यात सुधारणा करण्यात सैनी सरकारने पुढाकार घेतला. यातून सरकार बदलाच्या भूमिकेत असल्याचा संदेश गेला. सरकारी नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिल्यामुळे सरकार रोजगाराबाबत गंभीर असल्याचाही संदेश दिला.

लोकसभा निकालानंतर अधिक सजगता बाळगली
लोकसभा निवडणुकीत दहापैकी केवळ पाचच जागांवर विजय मिळविल्यानंतर भाजपाने आणखी जागरूक होऊन काम सुरू केले. ९० पैकी ४४ विधानसभा मतदारसंघात भाजपाला मताधिक्य मिळाले होते. तर काँग्रेसला ४२ मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तर आम आदमी पक्षाने चार मतदारसंघात आघाडी घेतली होती.

या निकालामुळे सैनी यांच्यावर टीका झाली. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दहा पैकी दहा जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी विधानसभेच्या ७९ जागांवर भाजपाने आघाडी नोंदविली होती. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ ४० जागा मिळाल्या आणि बहुमतापासून ते सहा जागांनी मागे राहिले.

या सर्व पार्श्वभूमीवर २०२४ च्या लोकसभा निकालाने भाजपाला धोक्याची घंटा मिळाली. लोकसभेनंतर सरकारने वास्तव स्वीकारले आणि त्यानुसार काम करायला सुरुवात केली. परिवार पेहचान पत्र आणि प्रॉपर्टी आयडीशी संबंधित योजनेशी ज्या काही अडचणी होत्या, त्या दूर करण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जमिनीस्तरावर काम करून भाजपाला मदत होईल, याची काळजी घेतली.

Previous Post

परळीच्या आयटीआयला लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे तर अंबाजोगाई आयटीआयला स्व.प्रमोद महाजनांचे नावपालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवली होती नावे; बीडच्या आयटीआयला स्व.विनायकराव मेटे यांचे नाव

Next Post

बांगरांच्या फुले बँकेत 13 कोटींचा अपहार;चेअरमन सत्यभामा बांगर अटक

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
Next Post
बांगरांच्या फुले बँकेत 13 कोटींचा अपहार;चेअरमन सत्यभामा बांगर अटक

बांगरांच्या फुले बँकेत 13 कोटींचा अपहार;चेअरमन सत्यभामा बांगर अटक

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?