बीड (रिपोर्टर) बीड नगर परिषदेमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या 55 वर्षीय कर्मचार्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली.
शेख फेरोज (रा. तेलगाव नाका बीड) हे बीड न.प.मध्ये चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील कर्मचार्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.