मुंबई/बीड (रिपोर्टर): अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा केज तालुकाध्यक्ष विष्णु चाटे याचा मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतला सहभाग पाहता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बीड जिल्हा कार्यकारिणीच आज बरखास्त करून टाकली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सदरची कारवाई केली असून चारित्र्य पडताळणीनंतर नेमणुका केल्या जाणार असल्याचे म्हटले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या हत्येने उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. या हत्या प्रकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा केज तालुकाध्यक्ष विष्णु चाटे हा आरोपी आहे. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. सदरची बाब गंभीरतेने घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आज बीडच्या कार्यकारिणीबाबत मोठा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीडची संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा केली. चारित्र्य पडताळणीनंतर पदाधिकार्यांच्या नेमणुका केचल्या जाणार असल्याचे यात सांगण्यात आले.









