परळी (रिपोर्टर): वाल्मिक कराड यांच्या विरोधात जातीय आणि राजकीय द्वेषातून कारवाया होत असल्याचा आरोप करत कालपासून परळी बंद असून आज दुसर्या दिवशीही व्यापार्यांनी कडकडीत बंद ठेवत कराड यांच्यावरील राजकीय द्वेषातून होत असलेल्या कारवाईचा निषेध केला. दुसरीकडे सिरसाळा, धर्मापुरी या ठिकाणीही बंद पाळण्यात येत असून वाल्मिक कराड यांचे गाव असलेल्या पांगरी येथे पाच तरुणांनी मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. काही जण पाण्याच्या टाकीवर चढले आहे तर हजारो गावकरी रस्त्यावर उतरून कराड यांच्यावरील गुन्हे परत घेण्याची मागणी करत आहेत. परळी तालुक्यात ठिकठिकाणी वाल्मिक कराड यांच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत.


विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडत वाल्मिक कराड यांच्या विरोधात राजकीय आणि जातीयद्वेषातून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत यामागणीसाीं परळीमध्ये कालपासून संतप्त आंदोलन होत आहे. काल दस्तुरखुद्द कराड यांच्या मातोश्री पारुबाई कराड यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या धरला होता. कालपासून परळी शहर बेमुदत बंद असून आजही परळीच्या व्यापार्यांनी बंद पुकारत कराड यांच्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईचा निषेध केला. परळी शहराबरोबर तालुक्यातील सिरसाळा, धर्मापुरी येथेही कहकडीत बंद पाळला जात आहे. इकडे वाल्मिक कराड यांचे जन्मगाव असलेल्या पांगरी गावात गावकर्यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. काही आंदोलक मोबाईलच्या टॉवर चढले तर काही आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून पोलीस प्रशासनाचा निषेध करत आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर निव्वळ जातीयवादातून कारवाई होत असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. जोपर्यंत कराड यांच्यावरील खोटे गुन्हे परत घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.














