वडवणी, (रिपोर्टर)ः- बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथे आकाशातून पाव किलो वजनाचे दोन दगड पडल्याचा प्रकार समोर आल्याने गावात मोठी चर्चा होती .यातील एक दगड शेतकर्याच्या घरावर पडल्यानंतर पत्र्याला छिद्र पडून तो थेट घरात आल्याचे दिसून आले .दुसरा दगड शेतकर्यांच्या घराशेजारील गायरान जागेत आढळून आला .या घटनेनंतर अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक आणि शास्त्रज्ञ गावात दाखल झाले होते .त्यांनी हे दोन्ही दगड ताब्यात घेतले असून आकाशातून पडलेले दोन्ही दगड उल्कापिंडत असल्याचं स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनी दिलंय.
लिमगाव येथील शेतकरी भिकाजी ज्ञानोबा अंभोरे यांच्या घरावर सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक मोठ्ठा आवाज आला .आपल्या घरावरील पत्राचा नेमका आवाज कशाचा आला यासाठी शोधाशोध केली असता घरात गेल्यावर पत्र्याला छिद्र पडून खाली दगड पडल्याचे दिसलं. तहसील प्रशासनातील अधिकार्यांनी दोन्ही दगडांचा पंचनामा केला असून हे दगड छत्रपती संभाजीनगर येथील एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांनी ताब्यात घेतले आहे. या अभ्यासकांनी गावाला भेट देऊन संशोधनासाठी दोन्ही दगड ताब्यात घेतले होते. साधारण पाव किलो वजनाचा आणि आणखी एक काळ्या रंगाचा दगड आढळून आल्याने शेतकर्यासह परिसरात मोठे कुतूहल वाढले होते .शेतकर्याने संबंधित दगडा संदर्भात ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाला कळवले होते .त्यानंतर वडवणीचे तहसीलदार वैभव महेंद्रकर तलाठी डढ यशवंत यांच्या पथकाने पंचनामाही केला .काही खगोलीय अभ्यासकांनी निमगावला भेट देऊन या दगडांची पाहणी केली . अभ्यासाअंती, साधारण 80 सेंटीमीटर आकाराचे हे उल्कापिंड असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे .
काय म्हणाले शास्त्रज्ञ ?
बीडमध्ये घडलेली घटना ही आशनीपाताशी संबंधित असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे . जी छायाचित्रने आम्हाला प्राप्त झाली, त्याच्यावरून हे काँड्राइड स्वरूपाचा उल्कापिंड असल्याचं आढळून येत आहे . त्यासोबत मिळालेल्या माहितीनुसार ज्या घराचा पत्रा फोडून एकदा गड खाली पडला तर ज्या मुलांनी आकाशातून दगड खाली पडताना पाहिला त्यावरून तरी हा आशनीपाताचा प्रकार असावा असे जाणवत असल्याचे खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी माध्यमांना सांगितलं .लवकरच या उल्कापिंडाला जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांकडून ताब्यात घेण्यात येणार आहे .त्यांच्याकडून त्याचा विश्लेषण करण्यात येईल तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल .असंही ते म्हणालेत.









