बीड, (रिपोर्टर) ः रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिर, गायगोटे, शेवगा, घरकूल, पांदण रस्ते यासह इतर योजना राबवल्या जातात. या योजनेचे पैसे मजूरांच्या खात्यावर पडतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सदरील योजनेच्या मागण्या बंद असल्याने मस्टर निघत नाही. मस्टर निघत नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले. मस्टर आज निघेल उद्या निघेल याची वाट लाभार्थी पाहात असतात. लाभार्थ्यांना विनाकारण पं.स. कार्यालयात चकरा मारण्याची वेळ येऊ लागली. याबाबत संबंधित अधिकार्याकडे काही गावचे सरपंच, उपसरपंच आज भेटणार होते.
बीड जिल्ह्यातील रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही वैयक्तिक कामे देखील रोहयो अंतर्गत होत आहे. विहिर, शेवगा, गायगोटे, घरकूल ही कामे वैयक्तिक आहेत. तर पाणंद रस्ते, खडीकरण इत्यादी कामे सार्वजनिक आहेत. या कामाचे पैसे मजूरांच्या खात्यावर जमा होतात. मजूरांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी मागण्या देऊन त्याचे मस्टर काढले जाते. मात्र, मागण्याच बंद असल्यामुळे मस्टर निघत नाही. पैसे खात्यावर पडत नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले. आज काही गावातील सरपंच, उपसरपंच बीड पं.स.च्या अधिकार्यांना भेटणार होते. प्रत्यक्षात भेटून मागण्या सुरू करण्याची मागणी करणार आहेत.










