बीड पंचायत समितीमध्ये अठरा गण आहेत. या गणाचे आरक्षण पुढीलप्रमाणे-वडगाव गुंधा (एस.सी.महिला), चर्हाटा (एससी पुरूष), नाळवंडी (ओबीसी महिला), ताडसोन्ना (ओबीसी महिला), ढेकणमोहा (ओबीसी पुरूष), पिंपळनेर (ओबीसी पुरूष), बहिरवाडी (ओपन महिला), माळापुरी (ओपन महिला), पाली (ओपन महिला), येळंबघाट (ओपन महिला), मोरगाव (ओपन महिला), चौसाळा (ओपन महिला), राजुरी (सर्वसाधारण पुरूष), कामखेडा (सर्वसाधारण पुरूष), घोडका राजुरी (सर्वसाधारण पुरूष), लिंबागणेश (सर्वसाधारण पुरूष), नेकनूर (सर्वसाधारण पुरूष), बोरखेड (सर्वसाधारण पुरूष) या अठरा गणाचे आरक्षण आज जाहिर करण्यात आले. यावेळी ओमप्रकाश देशमुख, तहसिलदार हजारे, गटविकास अधिकारी सानप यांची उपस्थिती होती. अक्षता खाडे या मुलीच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला.