-
बीड (रिपोर्टर) ओबीसी आरक्षण 27 टक्के काढण्याबातचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवडणुक विभागाने स्थानीक स्वराज्य संस्थेच्या सदस्य निहाय आरक्षण काढण्यास सुरूवात केली. बीड तालुक्यातील ग्रा.प. सदस्यांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. काल अनेक ग्रा.प.चे सदस्य निहाय आरक्षण काढले. आज काही ग्रा.प.सद्स्याचे आरक्षण त्या त्या गावामध्ये काढण्यात येत आहे.
स्थानीक स्वराज्य संस्थेच्या ओबीसी आरक्षणबाबतचा निर्णय झाल्यानंतर आता निवडणुक प्रकियेची लगबग सुरू झाली. मुदत संपत असलेल्या बीड तालुक्यातील ग्रा.प.च्या सदस्य निहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तालुक्यातील काही ग्रा.प.चे काल आरक्षण काढले. आजही अनेक ग्रा.प.चे आरक्षण काढण्यात येत आहे. यामध्ये खंडाळा, गोगलवाडी, तांदळवाडी घाट, घोसापूरी, शिदोड, नामलगांव, खामगांव, जप्ती पारगांव, कुक्कडगांव, आडगांव, गुंदावडगांव, गंगनाथवाडी, ईट, अंजनवती,बोरखेड, सुलतानपूर, हिंगणी, हिंगणीखुर्द, देवीबाभळगांव, शहाजानपूर, केतूरा, रुद्रापूर, सौंदाणा, पिंपरगव्हाण, खापरपांगरी, कुमर्शी, कारेगव्हाण, वडगांव, सानपवाडी, मांजरसुंबा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. दरम्यान सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रा.प.सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये हे आरक्षण काढण्यात येत आहे.उद्या या ग्रा.प.चे निघणार आरक्षण
-
उद्या दि.29-07-2022 रोजी मांडवजाळी,मंझेरीहवेली, करचुंडी, धनगरवाडी, काठोडा, वांगी, उमरद जहाँगीर, तांदळवाडी भिल्ल, पारगांव सिरस, बहाद्दरपूर, साक्षाळपिंप्री,नागपूर खुर्द, म्हाळस जवळा, चौसाळा धोत्रा, माळेवाडी घाट, लोणी घाट, वाडवणा या ग्रा.प.चे आरक्षण उद्या निवडणुक विभागाने दिलेल्या वेळेनूसार काढण्यात येणार आहे.