• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home कटाक्ष

कटाक्ष -कोण स्मशानात, कोण कब्रस्तानातकर्मातलं वैकुंठ अन् जन्नत

by गणेश सावंत
March 29, 2025
Reading Time: 1 min read
0
कटाक्ष -कोण स्मशानात, कोण कब्रस्तानातकर्मातलं वैकुंठ अन् जन्नत
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गणेश सावंत- 9422742810
एकीकडे धार्मिक ध्रुवीकरणात गुंतलेली आजची पिढी नव्हे तर आजचे सत्ता पिपासू पावलो पावली पहायला मिळतात. कुठं धर्माचा रंग चढवायचा, कुठं जातीचा रंग चढवायचा अन् कुठं जातीयवाद वाढवायचा एवढंच ध्येय सत्ताकारणामध्ये आजच्या राजकारण्यांसमोर आहे की काय ? हे राज्यात आणि देशात असलेल्या अस्वस्थतेवरून वाटते. लोकांच्या मुलभूत गरजा काय? त्याला किती महत्व द्यायचे, महत्व द्यायचे की नाही, यावर चिंतन -मंथन होण्यापेक्षा आज कुठल्या धर्माला कुठल्या धर्माच्या समोर उभे करायचे, कुठल्या जातीला कुठल्या जातीच्या समोर उभा करून पोरांची मस्तके भडकवायची एवढाच धंदा स्पष्ट ना स्पष्टपणे सांगायचं झालं तर काही राजकारण्यांचा सुरूय… म्हणूनच नागपुर सारखी दंगल घडते. परंतु, राजकारण्यांच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मनसुंब्याला थेट वेसन घालण्याचे कामही याच महाराष्ट्रात काही नव्हे तर कित्येक लोक करतांना दिसतात. माणूस जन्म मिळाला तो सार्थकी झाला परंतु हा जन्म निरर्थक धार्मिक आणि जातीय द्वेषातून कसा काळा निळा पडेल आणि जन्मलेला माणूस स्मशानात नाही तर कब्रस्तानात जाईल याची नीट व्यवस्था जाथ्ंयद्यांकडून केली जाते. परंतू


कोण स्मशानात
कोण कब्रस्तानात
जाईल. हे तर निश्‍चित, जन्माला आलेला माणूस एक ना एक दिवस स्मशानात नाही तर कब्रस्तानात जाणारच आहे. उरणार ते त्याचे कर्तव्य, कर्म… जगतजेता सिकंदर रिकाम्या हाताने आला अन् रिकाम्या हातानेच गेला. परंतू असे कित्येक समाजसुधारक, संत महात्मे, राजे- महाराजे होवून गेले की त्यांच्या कतृत्व कर्मातून आजही तुम्ही-आम्ही काही तरी शिकतोय अथवा त्यांच्या कतृत्व कर्माबरोबर त्यांनी दाखवलेल्या दिशेतून अथवा मार्गातून आजही आपण पदक्रंत होतोय. म्हणून माणसाने माणूस जन्मात आल्यानंतर जातीला अथवा धर्माला महत्व देण्यापेक्षा कर्तव्य कर्माला अणण्णय साधारण महत्व द्यावे तेव्हा कुठे जन्नत मिळेल अथवा वैकुंठ कधी मुस्लमानाचा तिरसकार करायचा कधी हिंदूंना भडकवायचे यांच्यात काही वाद झालेच नाही तर दलित सवर्ण समोर करायचे, यांच्यातही काही होत नाही तर मग अन्य छोट्या छोट्या जातींना आप आपसात भिडवायचे आणि स्वतः मात्र वैकुंठाचे स्वप्न पाहात नरकाची वारी करायची हे गोरख धंदे उभा महाराष्ट्र पाहतोय. औरंगजेबाच्या कब्ररीपासून नागपुरच्या दंगलीपर्यंत क्लूशित वातावरण असतांना तिकडे पुण्यात


ब्राम्हणाच्या वैकुंठासाठी
एक दाडीवाला, टोपीवाला पुढं सरसावला. ब्राम्हण कुटूंबातील एक बहिण आपल्या भावाचा मृत्यू होतो तेव्हा मला कोणी नाही, माझ्या भावाचा अंत्यसंस्कार करायचाय असे म्हणतेय तेव्हा ’पुणे‘ ‘कर’ धावायला पाहिजे होते. परंतू इथे धावला तो मुस्लमान त्याचा सर्वात मोठा सण त्याचे सर्वात पवित्र दिवस रमजानचे सुरू झाले होते. अल्लाहने आपल्या हातून हे कार्य सिध्दीस न्ह्यावे यासाठीच आपल्या हाती हे काम सोपवलं म्हणत जावेद खान नावाच्या मुस्लिम समाजातील व्यक्तींने ब्राम्हण समाजातील सुधीर किंकाळे यांचा विधीवत अंत्यसंस्कार केला. जावेद खान म्हणाले, मला मित्राचा फोन आला त्याने घटना सांगितली जयश्री किंकाळे, सुधीर किंकाळे हे वृध्द भाऊ- बहिण राहतात. सुधीर किंकाळे यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी करतो को जावेद खान तात्काळ ससूण रूग्णालयात पोहंचले तेव्हा सायंकाळ झाली होती. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली परंतू जयश्री किंकाळे म्हणाल्या आमच्या ब्राम्हण समाजामध्ये रात्रीचे अंत्यसंस्कार करत नाहीत तेव्हा जावेद खान यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी अंत्यसंस्कार करूअसे म्हणत जयश्री यांना धीर दिला. तुमचे नातेवाईक असो किंवा नसो आपण विधीवत अंत्यसंस्कार करू असा विश्‍वास दिला. पवित्र रमजानच्या महिन्यात जावेद खान यांनी त्या ब्राम्ह समाजाच्या व्यक्तींवर अत्यसंस्कार केले आणि तिथेच


मुसलमानाने वैकुंठाचा मार्ग
आपल्या कतृत्व कर्मातून दाखवून दिला. एकीकडे कबरीचे राजकारण करत स्वतःला हिंदूवादी समजणारे तथाकथीत धर्मांग जयश्री किंकाळेंच्या किंकाळ्या एैकायला नव्हते. त्या बहिणीचे आश्रु पुसायलाही पुण्यात कोणी हिंदूवादी पुढे सरसावले नव्हते. ते कार्य एक मुस्लिम आणि एक ख्रिश्‍चन बांधवांच्या हातून होणे होते. म्हणूनच आम्ही सातत्याने म्हणतो. जगाच्या पाठीवर जे तीन सर्वात्कृष्ट धर्म ग्रंथ आहेत. गीता, कुरान आणि बायबल या तिन्ही धर्मग्रंथाचे एका व्याक्यात सांगणे आहे. गीता कहैती है त्याग करो, कुरान कहैता हे यकीन करो, बायबल कहैता हे प्यार करो आणि जेव्हा या तीन धर्मग्रंथाच्या त्याग, यकीन आणि प्यार या संदेशाचा मर्म जेव्हा सर्व सामान्यातील सर्व सामान्याला समजतो तेव्हा नर्क किंवा जहांन्नुम दिसत नाही तर तिथं दिसते जन्नत, स्वर्ग, वैकुंठ.


वैकुंठाची व्याख्या काय?
अथवा अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रख हे म्हणण्याचा अधिकार कोणाला. आमच्या अल्प बुध्दीला एवढेच माहित, वैकुंठाची व्याख्या ही चांगले कर्तव्य कर्म आणि अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रख हे म्हणण्याचा अधिकार ही त्यालाच जो स्वतःच्या धर्माचा गर्व करत असेल परंतु दुसर्‍याच्या धर्माचा अनादर करणार नाही. जावेद खान यांनी पवित्र रमजान महिन्यामध्ये जे कर्म केलं ते कर्म महाराष्ट्र आणि अखंड हिंदूस्तानात धार्मिक जातीय ध्रुवीकरण करू पाहणार्‍याच्या कानशिलात सन सनीत चपराक म्हणावे लागेल. जगदगुरू संत तुकोबा वैकुंठावर भाष्य करतांना म्हणतात.
वैकुंठा जावया तपाचे सायास ।
करणें जीवा नाश करणे बहु ॥1॥
तया पुंडलिकें केला उपकार ।
फेडावया भार पृथ्वीचा ॥2॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥3॥
अर्थ
पूर्वी लोकास वैकुंठाला जाण्यासाठी तपश्‍चर्यासारखे कष्ट करावे लगत असत; त्यामध्ये जीवही गमवावा लगत असे .पण भक्त पुंडलिकाने भक्तांवर मोठा उपकार केला आहे; त्याने दाखविलेल्या भक्तीमार्गामुळे पृथ्वीवरच्या दुर्जनांचा भार कमी झाला .तुकाराम महाराज म्हणतात, की वैकुंठाची अवघड पायवाट सोपी झाली आहे, ही पायवाट म्हणजे पंढरीच्या रूपाने पृथ्वीतलावर वैकुंठ आले आहे.
आम्ही ही म्हणतो धार्मिक द्वेष पसरवण्यापेक्षा, जातीयवाद करण्यापेक्षा पुढार्‍यांच्या धार्मिक ध्रुवीकरणात गुंतण्यापेक्षा आपले कर्तव्य कर्म चारित्र्य स्वच्छ ठेवा इथे पृथ्वीवरच कुणाला वैकुंठ दिसेल कोणाला जन्नत लाभेल.

Previous Post

‘सरकार काय बोळ्याने दूध पितं का?’ खासदार उदयनराजे भोसले संतापले

Next Post

लिंबागणेशकरांनी नाकारली गुढी ; गुढी ऐवजी फडकविला शंभुराजेंचा भगवा ध्वज

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
Next Post
लिंबागणेशकरांनी नाकारली गुढी ; गुढी ऐवजी फडकविला शंभुराजेंचा भगवा ध्वज

लिंबागणेशकरांनी नाकारली गुढी ; गुढी ऐवजी फडकविला शंभुराजेंचा भगवा ध्वज

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?