बीड (रिपोर्टर) जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व नवनियुक्त शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी बुधवारी (दि.27) प्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सचिन मुळूक यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकला बांगर, गणेश नवले, अलकाताई डावकर, अर्जुन वाघमारे, बाळासाहेब कुरुंद, बंडू शिनगारे, धनंजय सोळंके, नितीन मुंदडा, गुंडीबा नवले, अभिजित भालेकर, अजित शिनगारे, समाधान पिसाळ, अजय दाभाडे, गौतम वैराळे, राजा पांडे, अनंत चिंचाळकर, अनंत सद्दीवाल, गणेश पवार, बालाजी शिंदे, बंडू कोंबडे, संजय पाटील, अशोक शेंडगे, विकास काशीद, विशाल लोखंडे, अंकुश कदम, गणेश साखरे, आकाश कसबे, नितीन दिवे, वैभव जाधव, नसीम शेख, मोहम्मद शेख, काझी सिद्दीक, सय्यद आमेर, पठाण मोईज, पठाण नगमान, शेख इब्राहिम, पठाण आसेफ, विकास राठोड, काळूराम पवार, विजेस राठोड, महेंद्र राठोड, कृष्णा पवार, नवनाथ चव्हाण, चंद्रकांत सदावर्ते, अनिल जाधव, शरद जाधव आदी पदाधिकार्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. लवकरच पदाधिकारी, शिवसैनिकांना जबाबदारी देण्यात येणार आहेत अशी माहिती सचिन मुळूक यांनी दिली आहे.
जिल्हाप्रमुखपदी सचिन मुळूक
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळे यांचे आता एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. सचिवांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी यावेळी स्वीय सहायक प्रभाकर काळे, बाजीराव चव्हाण आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती.