8 आरोपी जेरबंद, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड, (रिपोर्टर)ः- सौताडा शिवारातील जामखेड रोडवर चंदनाची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा मारून 5 लाख 96 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडून चोर मोटारसायकली व सहा मोबाईल जप्त करण्यात आले.
सौताडा शिवारातील जामखेड रोड व वंजारा फाटा परिसरातून चंदनाची अवैध वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा मारून 56 किलो चंदनाचा गाभा व 4 मोटार सायकल 6 मोबाईल जप्त केले. एकूण 5 लाख 96 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी पो.हे.कॉ.शरद बहिरवाळ यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिसात आरोपी संतोष रामदास पवार, गोविंद पंढरीनाथ निकम, अमोल एकनाथ मुरकुटे, छगन आश्रुबा दराडे, संदिप मुंगाजी जाधव, आजिनाथ जगन्नाथ गायकवाड, अंकुश गणपत शिंदे, अरूण लक्ष्म अडागळे तसेच चंदन खरेदी करणारा शिवाजी विटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक मधुसुदन घुगे, पो.हे.कॉ. शरद बहिरवाळ व त्यांच्या टिमने केली आहे.





