• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

प्रभू वैद्यनाथाला रुद्राभिषेक, अजितदादांचे कंत्राटदाराला खडेबोल ;विकास आराखडयासाठी निधी कमी पडू देणार नाहीकामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे -ना.अजित पवार

by गणेश सावंत
May 19, 2025
Reading Time: 1 min read
0
प्रभू वैद्यनाथाला रुद्राभिषेक, अजितदादांचे कंत्राटदाराला खडेबोल ;विकास आराखडयासाठी निधी कमी पडू देणार नाहीकामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे -ना.अजित पवार
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आज बीड जिल्हा दौर्‍यावर आहेत. परळीपासून त्यांनी आपल्या दौर्‍याला सुरुवात केली. परळी येथे विविध विकास कामांची पाहणी करून अधिकार्‍यांची महत्वपुर्ण बैठक घेतली. या वेळी वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन ते विकास कामाची पाहणी करण्यासाठी आले तेव्हा अजितदादांनी कंत्राटदाराला धारेवर धरत खडेबोल सुनावले. वैद्यनाथ मंदिराच्या पायर्‍यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी विचारना केली. कामाचा दर्जा सुधारण्याबाबत सक्त ताकीद देत परळी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांचीही कानउघडणी केली. या वेळी दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कार्यकर्ते बैठकस्थळी जमा झाले तेव्हा अजित दादांनी कार्यकर्त्यांचे निवेदन स्विकारत यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांना दिले. अजित पवारांचे परळीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. वैद्यनाथ मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, ना. पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथाला मंत्राच्या जयघोषात रुद्राभिषेक घातला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.


 श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले. विकास आराखड्यातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मात्र कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी आज परळी येथे प्रभु वैद्यनाथचे दर्शन घेतले. त्यानंतर परळी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात त्यांनी श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ ज्योर्तिंलिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंढे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये 92 कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणार्‍या कामांचे सादरीकरण करण्यात आले. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 286.68 कोटीच्या विविध 92 कामांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. दर्शन मंडपाचे काम, परिसर सुधारणा, मंदिरा भोवती दगडी फरशी, वास्तुशिल्प प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युतीकरण, सौर दिवे बसविणे, उद्यान विकसित करणे,  संरक्षण भिंतीचे बांधकाम, वाहनतळ यासह सुरू असलेल्या विकास कामांबाबत मुख्य वास्तुविशारद कृष्णकुमार बांगड यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ हे बारा ज्योर्तिंलिंगापैकी एक आहे. प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विकास आराखड्यातील कामेही दर्जेदार होणे अत्यंत आवश्यक आहे.  कामाच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने बारकाईने लक्ष घालणे आवश्यक आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता, निटनेटके पणा, सर्व सोई सुविधांयुक्त दर्शन मंडप, तसेच तीर्थक्षेत्र बालाजी, शिर्डी तसेच पंढरपूरच्या धर्तीवर भविष्यात भाविकांना सर्व सोईसुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडून यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. राज्य शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.  मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाईट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे. लेझर शो करताना किती वेळ शो असेल, त्यामध्ये भाविकांना कोणत्या बाबी दाखविल्या जातील यासह देण्यात येणार्‍या सेवा सुविधा दर्जेदार असायला हव्यात असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी विकसीत होते.

Previous Post

जिल्हा प्रशासन सावधान मोडवर

Next Post

परळी औष्णिक विद्युत केंद्राचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

संबंधित बातम्या

परळी

सकल मराठा समाजासाठी धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय; मराठा भवनासाठी जागा हस्तांतरित

by गणेश सावंत
May 15, 2026
परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
परळी औष्णिक विद्युत केंद्राचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

परळी औष्णिक विद्युत केंद्राचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

ताज्या बातम्या

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?