
रात्री 10 वा. मृतदेहाचे झाले शवविच्छेदन
नेकनूर, (रिपोर्टर) ः पवनचक्की कार्यालयामध्ये चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका दरोडेखोरावर सुरक्षा रक्षकांनी गोळी झाडली. त्यामध्ये तो ठार झाला. काल त्याची ओळख पटली नव्हती. रात्री मयताची ओळख पटली असून तो तुळजापूर येथील आहे. त्याच्यावर यापूर्वी चार गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याचे सांगण्यात आले. रात्री 10 वा. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
लिंबागणेश हद्दीतील महाजनवाडी येथे पवनचक्कीचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये चोरीच्या उद्देशाने काल रात्री दरोडेखोर आला होता. या दरोडेखोरावर सुरक्षा रक्षक रूपसिंग टाक यांनी गोळी झाडली. यामध्ये तो ठार झाला. त्याची काल ओळख पटली नव्हती. रात्री ओळख पटली असून त्याचे नाव राजू विष्णू काळे रा. तुळजापूर वय 24 वर्ष असे आहे. त्याच्यावर मारहाण, लुटमारीचे 4 असे गंभीर गुन्हे आहे. रात्री 10 वा. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोस्वामी हे करीत आहे.






