
असेल तर मदतीचा प्रस्ताव तात्काळ पाठवा
– धनंजय मुंडे यांच्या सूचना अन् फैसला ऑन द स्पॉट
सांत्वन पर भेटीसाठी आलेल्या धनंजय मुंडे यांनी अझहर खान यांच्या कुटुंबाला दिला आधार
परळी वैद्यनाथ (रिपोर्टर)- परळी शहरातील मलिकपुरा भागातील होतकरू तरुण अजहर खान यांचा महावितरणच्या तारेचा करंट लागून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज त्यांच्या कुटुंबाची सांत्वन पर भेट घ्यायला गेलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुन्हा एकदा फैसला ऑन द स्पॉट या कार्यपद्धतीचा या निमित्ताने पुन्हा एकदा परळी करांना प्रत्यय आला.
अजहर खान यांचा मृत्यू हा उघड्या पडलेल्या तारेचा करंट लागल्याने झाल्याचे समजताच, धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्या ठिकाणी महावितरणचे अभियंता श्री राठोड यांना बोलावून घेतले. त्यांच्याकडून वस्तुस्थिती समजून घेत महावितरण कडून जर तार उघडे राहिली असेल तर ती महावितरणची चूक असल्याने महावितरणच्या माध्यमातून अजहर खान यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठीचा प्रस्ताव तात्काळ शासनाला पाठवा अशा सूचना धनंजय मुंडे यांनी अभियंताची राठोड यांना केल्या.
परळी शहरात काही ठिकाणी काँक्रीट रस्त्याच्या मध्ये ट्रांसफार्मर आलेले आहेत त्यांचे शिफ्टिंग करण्यासह महावितरणच्या विविध अपग्रेडेशनच्या एकूण 15 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव देखील तातडीने पूर्ण करून तो प्रस्ताव देखील शासनाला पाठवावा अशाही सूचना यावेळी धनंजय मुंडे यांनी केल्या. मलिक पुरा भागातील आधार खान हे होतकरू तसेच धनंजय मुंडे यांचे सहकारी होते. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ही पुढाकार घेतल्याने अझहर खान यांच्या कुटुंबीयांना दिलासा व आधार मिळाला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, डॉ. संतोष मुंडे, राजेंद्र सोनी, सय्यद सिराज, शेख एजाज, श्रीकांत फड यांच्या सह स्थानिक पदाधिकारी व कुटुंबीय उपस्थित होते.







