
बीड (रिपोर्टर): राज्य शासनाकडून सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. विविध घोषणा करायच्या मात्र प्रत्यक्षात त्या घोषणांची अंमलबजावणी करायची नाही, सातत्याने महायुती सरकारकडून शेतकर्यांना आणि सर्वसामान्यांना खोटे आश्वासन दिले जाते. याच्या निषेधार्थ आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून ‘क्या हुवा तेरा वादा’ अशा घोषणा देत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
याबाबतचे लिखित निवेदन जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वात माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, गोरख शिंगण यांच्यासह आदी शिवसैनिकांनी तहसीलदार यांना दिले.
या वेळी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने अनेक योजनाचा मोठा गाजावाजा करुन जाहीर केलेल्या योजना कागदावरच राहिल्या आहेत.सरकारने सरड्याला लाजवेल असा रंग बदलला आहे. कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांना अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्ज भरायचे आदेश देऊन थट्टा केली आहे. एक रुपयात पीकविमा योजनेची घोषणा करुन शेतकर्यांनची फसवणूक केली आहे.ती योजना आता बंद केली आहे.
हर घर जल हर घर छत या योजनेच्या माध्यमातून मोठी स्वप्ने दाखवली खरी पण त्याची अंमलबजावणी केली नाही.मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पाची अपेक्षा केवळ कागदावरच राहिली.अशा प्रकारे हे शासन फक्त घोषणाबाजी करणारे असुन,लोकांची दिशाभूल करणारे आहे, दिशाभूल करुनच हे सत्तेवर आले आहेत यापुढे दिलेल्या आश्वासनाची पुरतता न केल्यास पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तीव्र आंदोलन केले जाईल व या शासनाला सळो की पळो करुन टाकण्याचा इशारा जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी दिला आहे. यावेळी जिल्हासहसचिव श्रीकृष्ण गायके ,किसान सेनेचे तालुकास़ंघटक भिमराव कुटे , तालुका सचिव नंदु येवले , सर्कल प्रमुख अशोक खांडे, माजी सरपंच सखाराम मोहिते, उपसरपंच बाळासाहेब कुटे , दत्ता शिंदे, प्रविण आरेकर ,बाबु कुटे , हनुमान कुटे ,राहुल काळे , दिपक घोरपडे,पाटील बुवा कुटे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






