
तालुक्यातल्या 12 खडी क्रेशरला तहसीलदारांनी लावले कुलूप
वॉशिबल वाळुचा भाव दोन हजार, त्यापेक्षा जास्त रुपयांनी विक्री करणार्या खडी क्रेशरची तक्रार करा -तहसीलदार
बीड (रिपोर्टर): बीड शहरानजीक सह तालुक्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खडी क्रेशर उभारण्यात आले आहेत. शासन नियमापेक्षा खडी क्रेशर चालकांकडून गौण खनिजची एकीकडे लूट हाते असतानाच खडी क्रेशर चालक आता सर्वसामान्यांची लूट करत आहेत. शसानाने वॉशिबल वाळुचा भाव अधिकतम दोन हजार रुपये ब्रास ठेवलेला असताना चार ते पाच हजार रुपये ब्रासने वॉशिबल वाळू विकली जाते. याबाबत प्रशासनाकडे अद्याप लेखी तक्रार आली नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. मात्र लेखी तक्रार आल्यावर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटले. तत्पूर्वी नूतनीकरण न केल्यामुळे बीड तालुक्यातील बारा खडी क्रेशर सील करण्यात आले आहेत.
बीड तालुक्यातील बीड शहरासह कर्झणी, तिप्पटवाडी, मांजरसुंबा, येळंबघाट, मोचीपिंपळगाव येथील बारा खडी क्रेशर केंद्र तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळावर जात सील केले. संबंधित खडी क्रेशर चालकांनी वार्षिक नूतनीकरण केले नसल्याने सदरची कारवाई केल्याचे शेळके यांनी म्हटले. परंतु खडी क्रेशर चालकांकडून सर्वसामान्यांची लूट होत आहे. एकीकडे वाळू मिळत नसल्याने शासनाने सर्वसामान्यांच्या बांधकामासाठी वॉशिबल वाळू निर्मितीकडे अधिक लक्ष देत खडी क्रेशर चालकांनी ती वाळू प्रतिब्रास दोन हजार रूपये अशी विक्री करण्याबाबत स्पष्टपणे सांगितले, परंतु खडी क्रेशर चालक चार ते पाच हजार रुपये ब्रासने सदरची वाळू विक्री करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.
घरकुलासह अन्य बांधकामे चालू आहेत. वाळू मिळत नसल्याने लोक वॉशिबल वाळूकडे अधिकतम लक्ष देत आहेत. परंतु तिथेही खडी क्रेशर चालक सर्वसामान्यांची लूट करत आहेत. एकतर गौण खनिज खांदताना शासनाच्या कुठल्याही नियमांची अंमलबजावणी होत नाही. याकडे महसूल विभाग पुर्णत: दुर्लक्ष करते. त्यात आता सर्रासपणे खडी क्रेशर चालक शासनाचा आदेश असताना वॉशिबल वाळू चढ्या भावाने विक्री करत आहेत. ज्या लोकांना वॉशिबल वाळू 2 हजारापेक्षा अधिक भावाने एखादा खडीक्रेशर चालक विक्री करत असेल, अडवणूक करत असेल तर त्याची थेट तक्रार जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार याचंयाकडे करावी, तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू, असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटले आहे.






