
सन 2017-18 मध्ये झाला होता सर्व्हे
बीड, (रिपोर्टर)ः- केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून दरवर्षी देशभरात लाखो लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जातात. गेल्या काही दिवसापुर्वीच घरकुलाची यादी मंजूर करण्यात आली होती. तोच आता बीड जिल्ह्यासाठी नवीन उद्दिष्ट आले आहेत. 94 हजार 780 घरकुले नवीन उद्दिष्टानुसार बांधण्यात येणार आहेत. सदरील या घरकुलासाठी 2017-2018 मध्ये सर्व्हे झालेला होता.
पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत दरवर्षी देशभरातल लाखो घरकुल मंजूर केले जात असतात. केंद्राच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने घरकुल बांधून मंजूरी दिली जाते. गेल्या काही दिवसापुर्वीच घरकुलाला मंजूरी देण्यात आली होती. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी 80 हजार 790 घरकुलांना मंजूरी मिळाली होती. हे घरकुल अजुन पुर्ण होत नाही तोच जिल्ह्यासाठी आणखी नवीन उद्दिष्ट आले. नवीन उद्दिष्टात 94 हजार 780 घरकुल बांधण्यात येणार आहेत. 2017-2018 मध्ये यासाठी सर्व्हे करण्यात आला हेाता.
त्या सर्व्हेनुसार हे घरकुल बांधण्यात येणार आहेत. यापुर्वी बीड जिल्ह्यात 5 वर्षात 34 हजार घरकुलांना मंजूरी देण्यात आली होती. गेल्या वर्षेभरामध्ये मात्र जिल्ह्यात घरकुलाचे मोठ्या प्रमाणात टार्गेट आले आहे. घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या पाटील मॅडम व यांची टिम करत आहे. लाभार्थ्यांना तात्काळ पैसे मिळावेत त्यांची ऑनलाईन प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी जिल्हा ग्रामीण विकास विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत असल्याचे दिसून येत आहे.






