
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
बीड, (रिपोर्टर)ः- बीड तालुक्यातील नाळवंडी ग्रा.पं अंतर्गत रोहियो योजनेत बोगसपणा झाला असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
नाळवंडी ग्रा.पं.अंतर्गत रोहियो योजनेच्या अंतर्गत विविध कामे करण्यात आली आहेत. मात्र त्यात भ्रष्टाचार झाला आहे. जुन्या कामांना नव्याने नावे देवून बिले उचलण्याचा घाट सरपंच यांच्याकडून होत आहे. या कामाची चौकशी करून संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. यावेळी राधाकिसन म्हेत्रे, गोपीनाथ काळे, तुलसीदास तावरे, परमेश्वर राऊत, सुंदर म्हेत्रे यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.
निवृत्ती वेतनासाठी उपोषण
नगर परिषद बीड येथील कर्मचारी यांना अंतिम निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन विषयी लाभ न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. यावेळी विष्णू गायकवाड, विलास जोगदंड, श्रीमती धुरंधरे, सय्यद रफिक यांच्यासह आदींची उपस्थिती आहे.








