
आष्टी (रिपोर्टर) : बीड जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर पोलिसांची कारवाई सुरु आहे. अनेक ठिकाणी टिप्परने वाळूची चोरी करताना तसेच वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे.
आष्टी तालुक्यातील तलवार फाट्याजवळ रामहरी सयाजी आटपाले वय 32 राहणार ब्रह्मगाव आष्टी याने त्याच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक एम एच 14 -ड 8149 मधून विनापरवाना बेकायदेशीर रित्या तीन ब्रास वाळूची चोरीची विक्री करताना आढळून आला यामध्ये बारा लाख किमतीचे टिप्पर व 15000 किमतींची वाळू मिळून आली असून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.





