
बीड, (रिपोर्टर)ः- शेतात जाण्यासाठी शिवरस्ता उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी मौज येथील एक शेतकरी कुटूंब चक्क शेतामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत. तर नेकनूर येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून ग्रा.पं. सदस्यास अपात्र करण्यात यावे या मागणीसाठी काही नागरीकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.

दिलीप दिनकरराव डावकर व भारत दिनकरराव डावकर यांना शेतामध्ये जाण्यास रस्ता उपलब्ध नाही. मौज शिवारातील गट नं.147 या शेतामध्ये रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी गावकर्यांनी अनेकवेळा महसुल प्रशासनाकडे केली. मात्र याची दखल महसूल प्रशासन घेत नसल्याने आज चक्क डावकर कुटूंबिय शेतामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत तर दुसरीकडे नेकनूर येथील सर्व्हे नं. 308 व 329 या ठिकाणी दहा फुटाच्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे सदरील हे अतिक्रमण काढून विद्यमान ग्रा.पं.सदस्य सय्यद साजेद अली युसूफ अली यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे या मागणीसाठी सय्यद रौनक अली, सय्यद मोहंमद अली यांच्यासह आदी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.






