
बीड, (रिपोर्टर)ः- माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदावर शिक्षण विभागाने दोन दिवसापुर्वी प्रियाराणी पाटील यांची नियुक्ती केली होती. आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.
नागनाथ शिंदे यांची बदली झाल्यानंतर काही दिवस हे पद रिक्त होते. शिंदे हे आपल्या कार्यकाळात कायम चर्चेत राहिले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक शिक्षण मंडळात सहसचिव या पदावर कार्यरत असणार्या प्रियाराणी पाटील यांची नियुक्ती बीड येथील जिल्हापरिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदावर करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षण संस्थामध्ये चुकीची कामे होतात त्यामुळे बीड येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी पद हे कायम चर्चेत राहते. पहिल्यांदाच शिक्षण विभागात एका महिला अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.






