
तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड, (रिपोर्टर)ः- जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरूणास तलवारीने मारहाण केल्याची घटना पॉवरहाउस डोगर परिसरात घडलेली आहे. या प्रकरणी तिघांजणांविरोधात पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,
रईस उस्मान अत्तार (रा.नुर कॉलनी, पेठ बीड) यास शेख मोहसीन, शेख जावेद, शेख सिकंदर (रा.शहेंशाहवली दर्गा परिसर) या तिघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. भांडण मिटवून घे असे म्हणत शेख रईस यास तलवारीने मारहाण करत जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी रईस यांच्या फिर्यादीवरूनआरोपी शेख मोहसीन, शेच जावेद, शेख सिकंदर या तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






