
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन
बीड (रिपोर्टर): उद्या बीड शहरामध्ये वक्फ बोर्ड विधेयका विरोधात निषेध सभा आयोजीत करण्यात आली आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व जमियत मजलीस उलमाये हिंदच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान उद्या मान्यवर मंडळी या सभेला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जमियत उलेमा व मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या पदाधिकार्यांनी दिली आहे. उद्या होत असलेल्या सभेच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मान्यवरांनी सभेबाबतची माहिती दिली.
शहरातील इज्तेमा मैदान मोमीनपुरा बायपास रोड या ठिकाणी दुपारी एक वाजता निषेध सभा आयोजीत करण्यात आलेली आहे. या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने वक्फ बोर्डचे बील आणलेले आहे. या बिलाला विरोध करण्यासाठी उद्याची निषेध सभा आयोजीत करण्यात आली आहे. सभेला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे अध्यक्ष फकीह असर हजरत मौलाना खालीद सैफुल्ला रहेमानी, बोर्डाचे सचीव हजरत मौलाना उमरी महेफूज यांच्यासह आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.






