
जिल्हा पास्टर्स संघटनेचे पोलीस अधिक्षकांना निवेदन
बीड (रिपोर्टर)ः- आ.गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यामध्ये एका मोर्चामध्ये भाषण करतांना ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरू गावात धर्मांतर करण्यासाठी आले तर त्या धर्मगुरूला मारहाण करणार्या व्यक्तीसाठी बक्षीस म्हणून एक लाख रुपये तर त्या धर्मगुरूचे हात पाय तोडणार्यास पाच लाख रुपये बक्षीस रुपी आणि त्या धर्मगुरूचा खून केला तर अकरा लाख रुपये बक्षीस जाहीर केले. अशा स्वरुपाचे वाचाळ आणि प्रेक्षोभक वक्तव्य आ.पडळकर यांनी केल्यामुळे राज्यातील आणि देशातील ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या आणि तसेच धर्मगुरूचा खुन करणे अशी भाषा वापरणे हे भारतीय संविधानाच्या कलम 25 नूसार गुन्हा आहे.
त्यामुळे देशात ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूला किंवा व्यक्तीला कुठे शिवीगाळ किंवा मारहाण झाली तर त्याला पडळकर यांना जबाबदार धरावे, पडळकर यांच्यापासून ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूला धोका आहे, त्यामुळे आ,पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे एका निवेदनाद्वारे बीड जिल्हा पास्टर्स बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने पोलीस अधिक्षक यांना निवेदनात म्हटले आहे,






