
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
परळी / बीड (रिपोर्टर)ः- कारद्वारे गुटखा जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळुन आला. गुटख्यासह कार असा एकुण 4 लाख 96 हजार 820 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पहाटे 1 च्या दरम्यान करण्यात आली.
अंबाजोगाई शहरामधून एका कारद्वारे गुटखा जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी पहाटे 1 वाजता चारचाकी गाडी ताब्यात घेतली. या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळुन आला. या प्रकरणी अजय उर्फ ऋषीकेश शिंदे (रा.होळ) याला ताब्यात घेण्यात आले. गुटख्यासह कार असा 4 लाख 96 हजार 820 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत सुतळे, राजचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे यांनी केली आहे.






