
बीड, (रिपोर्टर)ः- पांगरी रोडवर असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलमध्ये (क्लासेस) शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैर प्रकार केल्याने हे प्रकरण संपूर्ण राज्यभरात चर्चिले जात आहे. या प्रकरणात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या 5 जुलै रोजी बीडमध्ये येत आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्यासोबत त्या चर्चा करणार आहेत.






