
राष्ट्रवादीसह सामाजिक संघटनांचे न.प.विरोधात भिक मागो आंदोलन
अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः-अंबाजोगाई शहरातील मोढा भागात असलेले ऐतिहासिक विहिर नगर पालिका प्रशासनाने बुजवून तेथील जागा भाजपा कार्यकर्त्याला भाड्याने दिल्याने सर्व सामान्य नागरीकांसह राष्ट्रवादी काँग्रेस व इतर संघटनांनी यावर आक्षेप घेत न.प.च्या विरोधात संताप व्यक्त करून भिक मागो आंदोलन केले. या आंदोलनामध्ये माजी आ.साठे सह आदींचा सहभागा होता.
शहरातील मोंढा भागात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजुला असलेली ऐतिहासिक विहिर नगर पालिका प्रशासनाने बुजवली आणि त्या ठिकाणी गाळा काढून न.प.ने ती जागा भाजपा कार्यकर्त्याला भाड्याने दिली. ऐतिहासिक विहिर बुजवून जागा भाड्याने देण्याची गरज काय होती ? नगर पालिकेला एवढी भिक लागली का ? असा प्रश्न उपस्थित करत आज राष्ट्रवादीसह इतर संघटनांनी न.प.च्याविरोधात भिक मागो आंदोलन केले. या आंदोलनामध्ये माजी आ.पृथ्वीराज साठे सह आदींचा सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त करत निषेधाच्या घोषणा दिल्या. भिक मागून जे पैसे येतील ते पैसे नगर पालिका देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.





