
बीड (रिपोर्टर)- शहरात पुन्हा एकदा तोतया पोलिसांच्या टोळीने हातचलाखीने सोने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी गुजराथ कॉलनी परिसरात घडली. बीड शहरातील गुजरात कॉलनी येथे दोन चोरट्याने हातचलाखी करत तीन ते साडे तीन तोळे सोन्याचे दागिने पळवले. ही घटना शनिवारी सकाळी 8:45 च्या सुमारास घडली. बीड शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील गुजरात कॉलनी येथे अल्का सुभाष पगारिया वय 61 वर्ष यांना आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादन करत हातचलाखी करून तीन ते साडे तीन तोळ्यांच्या बांगड्या चोरटे घेऊन गेले. असा एकूण 55,000 रुपयांचेया प्रकरणा मुळे बीड शहरात गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीड शहर पोलिस करत आहेत.








