बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ग्रामविकास विभागाने धाराशीव येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची नियुक्ती केली होती. दोन दिवसानंतर आज त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.
वासुदेव सोळंके हे गेल्या साडेतीन वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदीच नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गेले तीन दिवस बीड जिल्हा परिषदेचे हे पद रिक्त होते. आज अखेर विलास जादव यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी किशोर काळे यांची नियुकती केली आहे मात्र अद्याप त्यांनी पदभार स्विकारले नसल्याने हे पद रिक्त आहे. ज्ञानोबा कघोकाटे यांची बदली झाल्याने हे पद रिक्त आहे.








