
पडळकर, अध्यक्षांना ‘तुम्हाला काय समजले’ म्हणाले
भास्कर जाधवांनी अध्यक्षांची माफी मागितली
विधान भवनात स्वत: शिव्या देत असतानाही आणि गावगुंड कार्यकर्त्यांच्या कारनाम्यानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची मुजोरी कायम असल्याचे आज विधानसभेत दिसून आली. मागासवर्गीय मुलांना गुणवत्ता यादीत आल्यास खुल्या यादीत दाखविले जात नाही. याबाबत लक्षवेधी मांडली होती. मात्र ही लक्षवेधी मांडताना पडळकर, तालीका अध्णयक्ष आणि मंत्री दादासाहेब भुसे यांच्यावर भडकल्याचे दिसून आले. त्यांनी तालीका अध्यक्षांना उद्देशून ‘काय कळलं, तुम्हाला या विषयात’ अशी विचारणा केली. काल विधीमंडळात आव्हाड, पडळकरांच्या कार्यकर्त्यात मारामारी झाली. याची चर्चा आज विधानसभेत करण्यात आली. अनेकांनी या मारामारीबद्दल आक्षेप घेत घडलेली घटना अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले.
दोषींवर कारवाई होणे अपेक्षीत असल्याचे सांगितले. दुसरीकडे काल भास्कर जाधवांनी अध्यक्षांकडे हातवारे केले. त्यावर भास्कर जाधवांनी अध्यक्षांची माफी मागितली. अज सभागृहामध्ये आखाड्याचे स्वरुप पाहायला मिळाले. विरोधकांनी या सर्व प्रकारावर राज्यपालांची भेट घेत काल झालेल्या मारामारी प्रकरणी आणि सत्ताधार्यांकडून दिल्या जात असलेल्या वागणुकीबाबत तक्रार केली.









