
वाहतूक शाखेने 40 रिक्षांवर केली कारवाई
बीड, (रिपोर्टर)ः-बीड वाहतूक शाखेने आज सकाळ पासून रिक्षा चालकाविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली. ज्या चालकाकडे रिक्षाचे कागदपत्रे नाहीत अशा रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केली. दुपारपर्यंत 40 रिक्षे ताब्यात घेण्यात आले होते.
बीड शहरासह जिल्हाभरात अनेक चालक विनाकागदपत्रचे रिक्षा चालवतात. रिक्षा चालकांच्या कागदपत्राची वाहतूक शाखेकडून झाडाझडती घेण्यास सुरूवात झाली. आज सकाळी पो.नि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षाची तपासणी केली जावू लागली. लायसन्स, इन्शुरन्स व गाडीची कागदपत्रे नसणारे रिक्षे ताब्यात घेण्यात आले. दुपारपर्यंत 40 रिक्षांवर कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई पो.नि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडे, कुडके, जाधवर, मोरे, तांदळे, जाधव, शिंदे, बांगर, गोरे यांनी केली.








