
गाडीत आराम करणार्या दोघांचे मोबाईल चोरीस
बीड (रिपोर्टर): घराच्या पाठीमागील खिडकीचे गज वाकवून घरामध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्याने घरामधील कपाटामध्ये असलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोख रकमेची चोरी केल्याची घटना देवीनिमगाव येथे घडली. चोरटयांनी तब्बल 72 हजार रुपयांपेक्षा जास्त रुपायांची चोरी केल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे पेट्रोल पंपासमोर थांबलेल्या गाडीत बसलेल्या इसमाच्या खिशातून मोबाईल चोरून नेल्याची घटना काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बीड-सोलापूर रोडवरील आहेरवडगाव फाट्यावर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या पनवेल येथे राहणारे मूळचे देवीनिमगाव (ता. आष्टी) येथील मच्छिंद्र नाथू झगडे यांच्या देवीनिमगाव येथील घराच्या पाठीमागील खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी घरामध्ये प्रवेश केला. घरामधील कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दहा रुपये, वीस रुपये, शंभर रुपये, पाचशे रुपयांच्या नोटा अंदाजे 72 हजार रुपये त्याचबरोबर 42 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी अंभोरा पोलीसात मच्छिंद्र झगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटट्यांविरोदात गु.र.नं. 267/2025 कलम 305 अ, 331 (4) भा.न्या.सं.2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरी चोरीची घटना बीड-सोलापूर रोडवरील मारुती पेट्रोल पंपासमोर आहेरगाव फाट्यावर घडली. फिर्यादी नितेश रामेश्वर शर्मा (रा. ब्राह्मणपुरा ता. शेगाव जि. बुलढाणा) हे प्रवासादरम्यान सदरील पेट्रोल पंपावर गाडी थांबवून आराम करत होते. त्या दरम्यान शर्मा व त्यांच्या मित्राच्या खिशातील दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गु.र.नं. 221/2025 कलम 305 ई, 334 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








