
अब्दुल सत्तारांनी घेतली मंत्री दत्तामामा भरणेंची भेट
महामंडळाच्या सदस्यांची महत्वपूर्ण बैठक
विषय तातडीने मार्गी लावण्याचे मंत्र्यांचे आदेश
बीड (रिपोर्टर): मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मार्फत मंजूर करण्यात आलेल्या मुदत कर्ज योजनेच्या लाभार्थी यांना कर्जाची रक्कम वितरित करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे बुधवार ( दि.16 ) रोजी अल्पसंख्याक विकास मंत्री ना.दत्ता मामा भरणे यांची भेट घेवून याबाबत पाठपुरावा केला. त्यावर मंत्री दत्ता भरणे यांनी तातडीने दखल घेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अल्पसंख्याक बोर्डाला बैठकीचे निर्देश देवून सदरील विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्या अनुषंगाने अल्पसंख्याक मंत्री भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी मौलाना आझाद अल्सपंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्यासह काही सदस्यांनी मंत्री दत्ता मामा भरणे यांना मंजूर कर्ज प्रकरणाची रक्कम वितरीत करण्यासाठी दिल्लीतील महामंडळाच्या संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधावा व लवकरात लवकर संबंधित कर्ज प्रकरणांची रक्कम वितरीत केली जावी यासह महामंडळाच्या अन्य महत्वाच्या विषयांवर महत्वपुर्ण चर्चा झाली. या वेळी दत्ता मामा भरणे यांनी अध्यक्षांसह सचिवांना काही सूचना केल्या.
या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष शेख जावेद, संचालक तय्यब शेख, शहा आलम खान, काजी आमीर, शेख वसीम, अल्पसंख्यांक मंत्र्यांचे खाजगी सचिव दातकर, मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गफ्फार मकदुम आदींसह कर्मचारी उपस्थित होते.








