विद्यमान बीडीओ यांना शेतकरी वैतागले
बीड., (रिपोर्टर)ः- बीड पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून प्रभारी बीडीओंची नियुक्ती केली जात आहे. सध्या गेवराई येथील बीडीओकडे चार्ज देण्यात आलेला असुन त्या कधी तरी कार्यालयात येतात. त्यांच्या बाबत शेतकर्यांच्या अनेक तक्रारी आहेत. बीड येथे मोरे म्हणून बीडीओंची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अद्यापही आपला पदभार घेतला नाही. ते कधी पदभार घेतात याकडे लक्ष लागून आहे. त्यांनी तात्काळ पदभार घ्यावा आणि बीड तालुक्यातील जे प्रलंबित कामे आहे ते मार्गी लावावेत.
प्रभारी बीडीओमुळे शेतकर्यांची कामे होत नाहीत. रोहियोची बीले मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. सध्या गेवराईच्या बीडीओ यांच्याकडे बीडच्या बीडीओचा पदभार देण्यात आलेला आहे. त्या कधी तरी कार्यालयात येतात, शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना गांभीर्य नाही. बीडच्या बीडीओपदी धुळे येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश बी. मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. ते आपला पदभार कधी घेतात याकडे लक्ष लागून आहे. त्यांनी पदभार घेतल्यानंतर प्रलंबित कामे मार्गी लागतील.








