
गुरुवर्य शांतीब्रह नवनाथ बाबा महाराज यांच्या मार्गदर्शना खाली भव्य कार्यक्रम पार पडणार
बीड (रिपोर्टर): विसाव्या शतकातील महान संत सद्गुरु किसनबाबा महाराज श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांच्या 27 व्या पुण्यमारणार्थी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन ह.भ.प. शांतीब्रम्ह गुरुवर्य श्री नवनाथ बाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दि. 02 ऑगस्ट शनिवार रोजी आरंभ होणार आहे.
दि. 02 ऑगस्ट शनिवार रोजी दीप प्रज्वलन ह.भ.प. महंत शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड, ह.भ.प गोपाळ म. शास्त्री पोखरी, ह.भ.प उद्धव म. चोले खडकी, कलश पूजन ह.भ.प महादेव महाराज श्री क्षेत्र चाकरवाडी, ह.भ.प महादेव महाराज राऊत जवळा, ह.भ.प. भागवत म. पुरी श्री क्षेत्र पंचमुखेश्वर भाटेपुरी, गुरूची प्रतिमा पूजन: ह.भ.प शांतीब्रम्ह माठाधिपती नवनाथ बाबा महाराज, गाथा पूजन, ज्ञानेश्वरी पूजन, टाक पूजन, विना पूजन, मृदुंग पूजन, हार्मोनियम पूजन हे होईल. या नंतर फुल टाकण्याचा कार्यक्रम होऊन व्यासपीठ पूजन होईल. अखंड हरिनाम सप्ताह आरंभ होईल. दि. 02ऑगस्ट शनिवार रोजी रात्री 09 ते 11वा. या वेळेत ह.भ.प समाजप्रबोधनकार निवृत्ती म. इंदोरीकर यांचे कीर्तन दि. 03 ऑगस्ट रविवार रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज सांगळे यांचे कीर्तन, दि 04 ऑगस्ट सोमवार रोजी ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे, 05 ऑगस्ट मंगळवार सचिन महाराज ढोले, दि 06ऑगस्ट बुधवार ह.भ.प. विशाल महाराज खोले, दि. 07 ऑगस्ट गुरुवार रोजी ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील, दि.08 ऑगस्ट शुक्रवार रोजी ह.भ.प.विश्वनाथ महाराज वारिंगे कोकणरत्न यांचे कीर्तन सेवा होणार आहे. दि. 09 ऑगस्ट शनिवार रोजी 12 ते 02 वा. ह.भ.प. संजयजी महाराज पाचपोर, रामायणाचार्य बुलढाणा विदर्भ यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.








