–
आमदार सोळंकेंच्या नेतृत्वाखाली होणार पक्षप्रवेश
माजलगाव, दिनकर शिंदे:
माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या दिग्गजांनी आमदार सोळंकेंसमोर मोठे आव्हान उभे केले होते. परंतु आमदार प्रकाश सोळंके यांचे मतदारसंघावर असलेले वर्चस्व व मतदारांच्या विश्वासावर पाचव्यांदा आमदार पदाची संधी सोळंके यांना मिळाली विरोधक हा विरोधक नसुन निवडणुकीपुरता राजकीय विरोध असतो असे समजणारे आमदार सोळंके जाणते नेते आहेत. आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाच्या एका दिग्गज नेत्याचा येत्या दोन दिवसात राष्ट्वादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच मुहूर्त ठरला ? असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
माजलगाव, वडवणी, धारूर या तिनही तालुक्यामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे मतदारसंघावर त्यांची पकड असुन विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आमदार सोळंके हे कार्यकर्त्यांची निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन विधानसभा निवडणुकीत केलेला विरोध देखील लक्षात ठेवुन अनेकांना राष्ट्वादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची संधी नव्याने देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात हीच त्यांची जमेची बाजु आहे. मागील अनेक वर्षांपासुन भाजपामध्ये एकनिष्ठ बडे नेते म्हणुन कार्यरत असलेले नेते यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अवघ्या दोन दिवसांत होणार असल्याची चर्चा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात आहे. आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या असलेल्या निवडणुकीमध्ये सर्वांनाच संधी देण्याचा प्रयत्न आमदार सोळंके निश्चीतच करतील असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.








