नगर रोडवरील घटना, व्हिडिओ व्हायरल
बीड, (रिपोर्टर)ः- पती पत्नीमध्ये आज सकाळी नगर रोडवर वादा वादी होवून चांगल्याच मारामार्या झाल्या. पत्नीने गाडीवर बसलेल्या पतीला झोडपले. पतीनेही प्रतिउत्तरात पत्नीला मारहाण केली. या दोघांची मारहाण नगर रोडवरील लोक पाहत होते. काहींनी त्यांचा व्हिडिओ शुट केला व सोशल मिडीयावर टाकला. पत्नील विदर्भातील तर पती बीड येथील असल्याचे सांगण्यात येते. या दोघांमध्ये भांडण कोणत्या कारणावरून झाले ते मात्र समजू शकले नाही. हे पती पत्नीचे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते.
आज सकाळी नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एका मोटार सायकलवर आलेल्या पतीस पत्नीने अडवून त्यास जाब विचारला. या दोघांच्या बाचाबाचीतून दोघात चांगलेच भांडण झाले. पत्नीने चक्क पतीला मारहाण करण्यास सुरूवात केली. पतीनेही प्रतिउत्तराखातर पत्नीला मारहाण केली. मात्र पत्नीने आपल्या पतीस चांगलेच धो धो धुतले. काहींनी या मारहाणीचा व्हिडिओ शुट केला व सोशल मिडीयावर टाकला. पत्नी विदर्भातील तर पती बीड मधील असल्याचे सांगण्यात येते. प्रेम करणातून या दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर या दोघात तिसरी आल्याची चर्चा होत आहे. हे पती पत्नीचे भांडण शिवाजी नगर पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते.








