बीड (रिपोर्टर): हवामानाचा अंदाज आता प्रत्येक गावामध्ये माहित होणार आहे. राज्य सरकारने राज्यातील 25 हजार 334 ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या खरीप हंगामाध्ये सदरील ग्रा.पं.मध्ये हवामान केंद्र सुरू असल्याचे दिसणार आहे.
राज्यभरातील 25 हजार 334 ग्रामपंचायतींमध्ये हवामान केंद्र स्थापन होणार असून तसे निर्देश राज्य सरकारने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. 1 ऑगस्टपासून कृषी विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका महिन्यात केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार. तीन महिन्यामध्ये हवामान केेंद्र गावपातळीवर बसवण्यात येणार. दुष्काळ, गारपीट, पूर, ढगफुटी, थंडीची लाट आदी नैसर्गिक आपत्तींची माहिती गावात हवामान केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. हवामान केंद्रासाठी केंद्राकडून 80 टक्के निधी मिळणार आहे. हा प्रकल्प 450 कोटी रुपयांचा आहे.
ReplyReply allForwardAdd reaction









