बीड रिपोर्टर
बीड नगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्याधिकारी नीता अंधारे यांची अखेर आज तडका फडकी बदली करण्यात आली . अंधारे यांच्या कार्यकाळामध्ये बीड नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनागोंदी कारभार सुरू होता अनेक वेळा अनेक लोकांकडून तक्रारी गेल्यानंतरही नीता अंधारे यांना सातत्याने पाठीशी घातले जात होते मात्र गेल्या दोन दिवसापासून सार्वजनिक बीड रिपोर्टरने नगरपालिकेमधील डिझेल घोटाळ्यासह बीड शहरातील नागरिकांसाठी कुठल्याही मूलभूत गरजा दिल्या जात नाहीत शहर अस्वच्छतेचे माहेरघर बनला आहे यासह अंधारे यांच्या मनमानी कारभाराचे वृत्त प्रकाशित केले होते अखेर रिपोर्टरच्या वृत्ताची दखल थेट मंत्रालयात घेतली गेली आणि आज नीता अंधारे यांची बदली करण्यात आली त्यांच्या जागी शैलेश खडसे हे बीड नपचा मुख्य अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत

याबाबत अधिक असे की बीड नगरपालिकेच्या दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात कुठल्याही कामाची पाहणी केली तर त्यामध्ये अनागोंदीपणा समोर येतो अनेक टेंडर मध्ये तडजोड आणि भ्रष्टाचार उघडपणे दिसून येतो बीड शहरात लोकांना पिण्यासाठी पाणी नसते शहर स्वच्छ नसते नगरपालिका लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करते हे केवळ नेता अंधारे यांनी बीड नगरपालिकेचा चार्ज घेतल्यानंतर सर्व अनागोंदी प्रकार सुरू झाला होता गेल्या वर्षभराच्या कालखंडात अंधारे यांच्या विरोधात शासन प्रशासन दरबारी अनेक तक्रारी गेल्या मात्र त्या तक्रारींची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जात नव्हती गेल्या आठ दिवसाच्या कालखंडात बीड नगरपालिकेचा अनागोंदी कारभार दैनिक बीड रिपोर्टर सचित्र प्रकाशित करीत आहे बीड शहरातली स्वच्छता असो नाल्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार असो अथवा डिझेल भ्रष्टाचार असो यासह अन्य भ्रष्टाचाराबाबत रिपोर्टर सातत्याने वृत्त प्रकाशित केले अखेर आज बीड शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण करणारे नीता अंधारे यांची बदली करण्यात आली आहे रिपोर्टरच्या वृत्ताची दखल थेट मंत्रालयात घेतली गेल्याचे कळते अंधारे यांच्या जागी बीड न बचे मुख्याधिकारी म्हणून शैलेश फडसे हे जबाबदारी स्वीकारणार आहे









